राजपत्र
शासकीय विधिविधान, अधिनियम, अधिसूचना, देशाच्या संविधानानुसार झालेल्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुका व शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, कामकाजविषयक घोषणा व निर्णय आणि धोरणात्मक निवेदने प्रसृत करणारे सरकारी नियतकालिक. प्राचीन काळी अधिकृत शासकीय बातम्या, समाचार आणि धोरणात्मक निवेदने प्रसृत केली जात.